Ad will apear here
Next
ओशी, हरचिरी गावांमध्ये महिलांच्या आरोग्य तपासणी शिबिराला प्रतिसाद


रत्नागिरी :
रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा, जिल्हा शासकीय रुग्णालय व महिला आर्थिक महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी तालुक्यातील ओशी, हरचिरी येथे महिलांसाठी नुकतेच आरोग्य शिबिर घेण्यात आले. या वेळी उच्च रक्तदाब तपासणी, रक्तातील साखरेचे प्रमाण, मौखिक आजार आदींची तपासणी करण्यात आली. तसेच मानसिक आजार, स्तनाच्या कॅन्सरची लक्षणे व उपचार यांसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. 

जिल्हा रुग्णालयातर्फे डॉ. उत्तम कांबळे (वैद्यकीय अधिकारी, एनसीडी विभाग), डॉ. मधुरा भागवत (मानसिक आरोग्य विभाग), डॉ. गौरव पाटील (फिजिओथेरपिस्ट), स्टाफ नर्स प्राजक्ता जक्कर, श्री. आहेर, सामाजिक कार्यकर्त्या श्वेता चव्हाण आदी या वेळी उपस्थित होते.



डॉ. उत्तम कांबळे यांनी स्तनाचा कॅन्सर ओळखण्याची पद्धत, उपचार, तसेच महिलांच्या आरोग्याबद्दल माहिती सांगितली. डॉ. मधुरा भागवत यांनी मानसिक आरोग्याबद्दल माहिती दिली. डॉ. गौरव पाटील यांनी सांधेदुखी व त्यावरील व्यायामांची माहिती दिली. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या दीपाली देवरुखकर व वैशाली सॉलिम यांनी कार्यक्रमाचे नियोजन, सूत्रसंचालन केले. 

रिलायन्स फाउंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक राजेश कांबळे व कार्यक्रम सहायक विनोद गवाणकर यांनी कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले. या आरोग्य तपासणी कार्यक्रमाला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZMDCH
Similar Posts
नर्सिंग कौशल्याद्वारे देशाच्या विकासात योगदान द्यावे रत्नागिरी : ‘विद्यार्थिदशा करिअर घडवणारी असून, नियमित व्यायाम, योगासने, योग्य वेळी नाश्ता, जेवण ही एक साखळी आहे. यातील कोणतीही गोष्ट अवेळी केल्याने प्रश्न उभे राहतात. त्यामुळे शिस्तीने वागावे, संगीत ऐकावे. त्यातून आपल्या क्षमतांचा विकास होतो. नर्सिंग कौशल्याद्वारे आपण देशाच्या विकासात योगदान द्यावे,’
रत्नागिरीत एक डिसेंबरला वंध्यत्वासंदर्भात मोफत तपासणी शिबिर रत्नागिरी : रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी अँड रिसर्च सेंटरच्या वतीने एक डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ११ ते दुपारी एक या वेळेत धन्वंतरी रुग्णालयात वंध्यत्व निवारणासंदर्भात मार्गदर्शन व मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
प्रदूषणमुक्त कोकणाचा संदेश देण्यासाठी रत्नागिरी ते गोवा सायकलवारी; १० जणांची ‘कोकण भरारी’ रत्नागिरी : रत्नागिरी ते गोवा हे ३१२ किलोमीटरचे अंतर तीन दिवसांत सायकलने यशस्वीरीत्या पार करून रत्नागिरीतील १० सायकलपटूंनी प्रदूषणमुक्त कोकणाचा संदेश सर्वांना दिला. वीरश्री ट्रस्ट आणि सायकल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ही सायकलची ‘कोकण भरारी’ मोहीम नुकतीच पार पडली.
रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी निःशुल्क हेल्पलाइन; ध्वनिसंदेशांद्वारे माहिती रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील १५ हजार शेतकऱ्यांना कृषी, पशुसंवर्धन, आरोग्य, तसेच आपत्ती व्यव्यस्थापन विभागामार्फत विविध प्रकारच्या योजना, शेती-पशुपालनाची तांत्रिक माहिती, सामाजिक उपक्रम, रोजगार आदींसह अन्य आवश्यक माहिती ध्वनिसंदेशामार्फत देण्याचा उपक्रम नुकताच सुरू झाला. रिलायन्स फाउंडेशन माहिती

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language